About Us

आमची प्रेरणा 

 

मा.विनोद तावडे

मंत्री

शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व

तंत्र शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य

 

 

 

मा. नंद कुमार  (I.A.S) 

प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,

महाराष्ट्र शासन

   

 

 

                                                   मा.धीरजकुमार (I.A.S)

    आयुक्त शिक्षण ,तथा संचालक

       विद्या प्राधिकरण ,महाराष्ट्र राज्य ,पुणे..


               मा.आनंदजी रायते (I.A.S)

 मुख्य कार्यकारी अधिकारी

     जिल्हा परिषद उस्मानाबाद . 

 

 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद.

संस्थेची उद्दिष्टे

 1. प्राथमिक शिक्षण,प्रौढ व अनौपचारिक कार्येकर्ते यांची व्यावसायिक व शैक्षणिक क्षमता सुधारणे.
 2. शिक्षकांना सेवापूर्व तसेच सेवांतर्गत प्रशिक्षण देणे.
 3. जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण निर्माण करणे व ते टिकवून ठेवणे.
 4. प्राथमिक शाळा,प्रौढ शिक्षण केंद्रे व सामाजिक कार्येकर्ते यांचेसाठी स्त्रोत केंद्रे म्हणून कार्य करणे.
 5. मूल्याधिष्ठित शिक्षण,कार्यानुभव,परिसर अभ्यास,लोकसंख्या शिक्षण,व्यावसायिक व विज्ञान शिक्षण यातील प्रशिक्षण देणारी संस्था व जिवंत स्त्रोत म्हणून कार्य करणे.
 6. शाळा समूह योजनेवरील शाळांना वैयक्तिक शिक्षकांना संशोधन,ज्ञानसंवर्धन व नियोजन या क्षेत्रातील मार्गदर्शक सेवा पुरविणे.
 7. व्यावसायिक संघटनांना शैक्षणिक मार्गदर्शन करणे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची कार्य :-

१.पात्र उमेदवारांना दोन वर्षाचे दर्जेदार सेवापूर्व प्रशिक्षण देणे.

२.जिल्हयातील प्राथमिक,निर्देशक व निरिक्षकांना निरंतर व सेंवांतर्गत प्रशिक्षण देणे.

३.अनौपचारिक व प्रौढशिक्षण देणार्‍या केंद्गानां संस्थांना सतत स्त्रोत पुरविणारी व संशोधन करणारी संस्था म्हणून कार्य करणे.

४.शाळा समूह योजनेतील शाळांना,संशोधनासाठी शिक्षकांना,ज्ञानसंवर्धन व नियोजन कार्यात मार्गदर्शन सेवा उपलब्ध करून देणे.

५.संस्था प्रमुखांचे संस्थानिहाय नियोजन व व्यवस्थापन आणि सुक्ष्मस्तरावरील नियोजन या बाबतीत प्रशिक्षण व उद्‌बोधन करणे.

६.समाजसुधारणा,स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते व शालेय स्तरावरील शिक्षणावर प्रभाव पाडणारे कार्यकर्ते यांचा शिक्षण कार्याच्या दृष्टीने उद्‌बोधन करणे.

७.मूल्याधिष्ठित शिक्षण,कार्यानुभव,परिसर अभ्यास,लोकसंख्या शिक्षण,व्यावसायिक व विज्ञान शिक्षण यातील प्रशिक्षण देणारी संस्था व जिवंत स्त्रोत म्हणून कार्य करणे.

८.जिल्हयातील प्राथमिक शाळांना तंत्रज्ञान व संगणक सेवा केंद्ग म्हणून कार्य करणे.

९.प्राथमिक व उच्च प्राथमिक अनौपचारिक व प्रौढ शिक्षण शाळा व केंद्ग यांचे मूल्यमापन करणे.

१०.नाविण्यपूर्ण व उपयोगी उपक्रम व कृती संशोधन करणारे केंद्ग म्हणून कार्य करणे.

११.जिल्हा शिक्षण मंडळ व शाळा समूह केंद्ग यांना मार्गदर्शन करणे व सल्ला देणे.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.डाएट ४५१६/(४०/१६)/प्रशिक्षण, दिनांक १७ ऑक्टोंबर २०१६ च्या शासन निर्णयान्वये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाची पुनर्रचना –

 • या शासन निर्णयान्वये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएटच्या या नावा ऐवजी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (DIECPD)असे नामकरण करण्यात  आले आहे.

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेची(DIECPD)संरचना :-

 • जिल्हास्तरीय शैक्षणिक व्यावसायिक विकास संस्थेची रचना विद्यापरिषदेच्या रचनेप्रमाणे (विषयनिहाय) केली आहे. त्यातले १-२ सदस्य हे समन्वय आणि मूल्यमापनाची जबाबदारी पार पाडतील.रिक्त असलेली सर्व पदे लोकसेवा आयोगाकडून भरेपर्यंत प्रतिनियुक्तीने भरण्यात येतील.यापुढे राज्य लोकसेवा आयोगाकडून पदे भरताना विषय व्यवस्थेनुसार भरण्यात येतील.विषय व्यवस्थेनुसार डाएट स्तरावर भाषा,गणित,विज्ञान,इंग्रजी,समावेशी शिक्षण आणि या विषयासाठी प्रत्येकी ३ कार्यक्षम (एक नियमित सेवा व २ प्रतिनियुक्ती) उपक्रमशील तज्ञांची गरज भासणार आहे.सध्या मंजूर पदे यासाठी पुरेशी पडणार नसल्यामुळे प्रत्येक डाएटमध्ये १२ अतिरिक्त शैक्षणिक पदे निर्माण करण्यात येतील व ज्या ठिकाणी ऊर्दू भाषेसाठी काम करणे आवश्यक आहे,त्या ठिकाणी ऊर्दू भाषेसाठी अतिरिक्त २ पदे असे काही ठिकाण १४ पदे प्रतिनियुक्तीने भरण्यात येतील.११ राजपत्रित २ पदे आणि अतिरिक्त १२ अथवा काही ठिकाणी १४ असे मिळून २३ अथवा २५ लोक प्रत्यके जिल्हास्तरीय संस्थेमध्ये कार्यान्वित राहतील.जिल्हास्तरीय संस्थेमधील लिपिकांची २ पदे व लघुलेखकाचे १ पद कमी करण्यात येतील.बाकींची ९ किंवा यथास्थिती ११ पदे इतर पदांच्या समायोजनातून निर्माण करण्यात येतील.

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेची(DIECPD)कार्ये :-

 1. १.जिल्हास्तरीय संस्था यापूर्वी करीत असलेल्या कार्यासह खालील कामेसुध्दा पार पाडतील.
 2. केंद्ग प्रमुख आणि तालुकास्तरीय साधन व्यक्ती यांना क्षमता वृध्दीसाठी संधी उपलब्ध करून देईल.
 3. शिक्षक, केंद्ग प्रमुख,तालुका स्तरीय साधन व्यक्ती यांना संदर्भ साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्य करेल.
 4. राज्यस्तरीय मुक्त दूरस्थ अध्ययनासाठी संपर्क केंद्गाचे संचलन करण्यासाठी मदत करेल.
 5. जिल्हास्तरीय संस्थेमध्ये साधन केंद्ग विकसित करेल.
 6. विषयनिहाय चर्चासत्रांचे नियोजन व आयोजन करेल.
 7. व्यवस्थापन शास्त्रानुसार शिक्षकांच्या गरजा निश्चित करण्यासाठी संशोधन उपक्रम राबवेल.
 • शाळा स्तरावरील समस्या जाणून घेण्यासाठी शाळांना भेटी देईल,त्याचा हेतू शाळांची तपासणी करणे नसून शाळास्तरावरील विविध समस्या जाणून घेणे हा आहे.

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था प्रमुखांचे खालील बाबीं संदर्भात सक्षमीकरण करेल.

१.शिक्षकांच्या गरजा निश्चित करण्यासाठी सक्षम करणे. केंद्ग प्रमुखांनी जिल्हास्तरीय संस्थेकडे त्याप्रमाणे मागणी करावी.

२.विद्‌यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीचे विश्लेषण करण्यास शिक्षकांना मार्गदर्शन करणेसाठी सक्षम करणे.

३.वर्गकार्याचे निरीक्षण आणि प्रत्याभरण करण्यासाठी सक्षम करणे.

४.अध्यापन पध्दतीतील बदलांबाबत सहाय्य,प्रोत्साहन व संसाधनांची उपलब्धता करून घेण्यासाठी सक्षम करणे.

५.केंद्ग संमेलनांना प्रोत्साहन – संकलित माहिती व आधारित विषय पत्रिका तयार करणे.(शिक्षकांच्या गरजा, वर्गकार्य निरीक्षणातील नोंदी),शिक्षकांमधील संवाद,चांगल्या पध्दतीचा प्रसार,इत्यादी क्षमता समृध्दी कार्यशाळेतील प्रतिसादांचा पाठपुरावा यासाठी सक्षम करणे.

६.शाळेचे शैक्षणिक नियोजन – वयानुरूप प्रवेश,विशेष गरजा असणार्‍या विद्‌यार्थ्यांच्या शाळेतील प्रवेश यासाह शिक्षकांनी विद्‌यार्थ्यांच्या अध्ययनाबाबत स्वतः काढलेले निष्कर्ष  याबाबत केंद्ग प्रमुखांनी करावयाची निरीक्षणे